कैलास मानसरोवर यात्रा जूनअखेरपासून सुरू   

डेहराडून : कैलास मानसरोवर यात्रेला ३० जूनपासून प्रारंभ होत आहे. सुमारे पाच वर्षानंतर पुन्हा यात्रा सुरू होत आहे. त्यामुळे पर्यटक आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. 
 
उत्तराखंडच्या पिठोरागढ जिल्ह्यातील १८ हजार फुटांवरील लिपुलेख मार्गे यात्रा सुरू होणार आहे. दरवर्षी यात्रा होते. मात्र, २०२० मध्ये कोराना संकटामुळे ती बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनेकदा ती सुरू करण्याचे प्रयत्न झाले होते. पंतप्रधान नरेंंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्यात चर्चा झाल्यानंतर यंदापासून पुन्हा यात्रा सुरू करण्याबाबत निर्णय झाला याबाबतची माहिती देण्यात आली. 
 
उत्तराखंडमधील यात्रा नियोजन समिती आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्यात बैठक झाली. कुमाऊ मंडळ विकास निगमकडे यात्रेची जबाबदारी सोपविली आहे. दिल्ली येथे ३० जून रोजी यात्रेला प्रारंभ होणार आहे  ५० भाविकांचे पाच गट असतील. एकूण २५० भाविक यात्रेला आनंद लुटू शकणरा आहेत. पहिला गट लिपुलेख मागे चीनच्या हद्दीत १० जुलै रोजी आणि शेवटचा गट २२ ऑगस्ट रोजी चीनमधून भारतात परतेल. यात्रेचा 

एकूण कालावधी २२ दिवसांचा असेल

कैलास मानसरोवर यात्रा आटोपून भाविक एक दिवस चीनमध्ये राहतील. त्यानंतर ते पिठोरागढ जिल्ह्यातील बुंदी आणि एक रात्र छौकोरी येथे आणि नंतर दिल्लीत परततील. तत्पूर्वी सर्व यात्रेकरुंची आरोग्य तपासणी दिल्ली आणि गुंजी येथे करण्यात येणार आहे. 
 

Related Articles